Ad will apear here
Next
श्री व्याडेश्वर शिवहर
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हे सागरी किनारपट्टीवरील अतिशय रमणीय, निसर्गसंपन्न गाव आहे. परशुरामांनी निर्माण केलेली, सागराच्या गर्भातून उत्पन्न झालेली, पावनभूमी म्हणजे गुहाघर, असे याचे वर्णन 'श्री व्याडेश्वर शिवहर'मध्ये कविता मेहेंदळे यांनी केले आहे.

या भूमीत शिवशंकराचे मंगलमयस्थान असलेल्या व्याडेश्वर मंदिराची माहिती लेखिकेने या पुस्तकात दिली आहे. श्री परशुराम क्षेत्र वलय, परशुराम मंदिर यांची ओळख करून मंदिर म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे. गुहाघरमध्ये प्रवेश केल्यावर भरबाजारपेठेतील पूर्वाभिमुख श्री व्याडेश्वर मंदिराची माहिती दिली आहे.

मंदिराची लोककथा, व्याडेश्वराची दिनप्रणाली, मंदिरातील सण, उत्सव, धार्मिक विधी कोणते असतात, हे सांगितले आहे. त्याचबरोबर शिवसंकल्पना, शिवस्वरूप, शिवलिंग पूजा, गौरी-शंकर या संकल्पना विशद केल्या आहेत. जीनिव्हातील 'सर्न' नटराज मूर्ती, बारा ज्योतिर्लिंगे, शिवतीर्थक्षेत्रे, शिवमहतीच्या कथा, व्रत-उपासना, गुहाघरमधील मंदिराविषयीही यात लिहिले आहे. शंकराची स्तोत्रे, आरत्याही आहेत.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IVXAAZ
Similar Posts
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती
निर्णय आणि जबाबदारी समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही
सहज लिहिताना लिहिण्याची आवड अनेकांना असते. तशी आवड शासकीय सेवेत असूनही शहाजी कांबळे यांनी जोपासली आणी मनात हळुवारपणा जपून अनेक विषयांवर मनातील विचार ते लिहित गेले. जे सहज सुचले, जे मनाला स्पर्शून गेले, जे स्वतः अनुभवले, ते त्यांनी 'सहज लिहिताना...'मधून मांडले आहे. यात पत्नीचा सोशिकपणा, माहेरपानाला आलेल्या मुलीच्या
व्हॉट्स अप ? 'ही गोष्ट आहे डॉ. सुजय शास्त्रीची, एका रेडिओलॉजिस्टची! आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावं असं वाटत असताना, 'व्हॉट्स अप'मुळे त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, त्याची ही गोष्ट...' डॉ. अमित बिडवे यांनी प्रस्तावनेतच कादंबरीची अशी उत्कंठावर्धक सुरवात केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language